Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज अनंतात विलीन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशीम १ नोव्हेंबर :- बंजारा समाजाचे आद्यसंत सेवालाल महाराज यांचे वंशज व देशभरातील बंजारा बांधवांचे धर्मगुरू डॉ रामराव महाराज यांच्या पार्थिवावर आज वाशीम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यार आले. यावेळी त्यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या आंध्र, कर्नाटक,तामिळनाडू सह राज्यातील हजारो बंजारा बांधवांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या स्व रामराव महाराजांचे 30 अक्टोबर रोजी मुंबई येथील लीलावती रुग्णालयात देहावसान झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथून पोहरादेवी येथे घेऊन येत असताना रस्त्यात ठिकठिकाणी भक्तजनां कडून अंतिम दर्शन करण्यात येऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

स्व रामराव महाराज यांचे पार्थिव काल रात्री 9 30 वाजता पोहरादेवी येथे पोहोचले यावेळी परिसरातील गावा गावातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीप प्रज्वलित करण्यात येऊन भक्तां कडून आदरांजली वाहण्यात आली.रात्रभर हजारो भक्तांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज दुपारी 1 वाजता स्व रामराव महाराजांचे पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.याआधी मंदिर परिसरात तिरंग्या ध्वजात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.त्यानंतर उपस्थित पोलीस जवानां कडून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.यावेळी हजारो भक्तां सह पालकमंत्री ना शंभूराजे देसाई, वनमंत्री ना संजय राठोड, खासदार भावना गवळी आमदार राजेंद्र पाटणी उपस्थित होते.

Comments are closed.