रावसाहेब लोकसभेत दानवे तर विधानसभा निवडणुकीत दानव आहेत,येणाऱ्या लोकसभेत त्यांना परिणाम भोगावे लागतील अब्दुल सत्तार
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना 13 जानेवारी:- राक्षसाला गाडून येणाऱ्या साडेतीन वर्षात अब्दुल सत्तारांची टोपी उतरवणार असल्याचं सांगत शिवसेनेचे जालना जिल्ह्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर नाव न घेता शरसंधान साधलं आहे. जालन्यातील टाऊन हॉल परीसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज युवा सेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्यात अर्जुन खोतकर आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.
माझ्या डोक्यावर टोपीचं ओझं आहे. रावसाहेब दानवे म्हणजे मूह मे राम बगल मे छुरी असल्याचं सांगत लोकसभा निवडणुकीत रावसाहेब हे दानवे असतात तर विधानसभा निवडणुकीत दानव असल्याची टीका सत्तार यांनी केली आहे. दानवे यांनी माझा बिस्मिल्ला करण्याचा प्रयत्न केला आता त्यांचा मि बिस्मिल्ला करणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे. निवडणूक जवळ आली की सत्तार मला मदत करतात असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं. यावर देखील सत्तार यांनी भाष्य केलंय. रावसाहेब दानवे यांना मि लोकसभा निवडणुकीत एक लाखांची लीड दिली मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी मित्र किती गद्दार असतो हे दाखवून दिलं त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’ असं सांगत त्यांना निवडणूकित याचे परिणाम भोगावे लागतील असा ईशारा देखील दिला आहे.
Comments are closed.