Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ३० एप्रिल : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपाडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्र.तहसिलदार किशोर भांडारकर, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, चंहादे,  दयाराम मेश्राम, जी. आर. मालवी,  जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर बेले, वामन खंडाईत  उपस्थित होते.

उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती थोडयाच लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.