रविकांत तुपकरांचा बुलडाणा महावितरणला शेवटचा अल्टीमेटम..
वीज कनेक्शन कापायला कुणीही अधिकारी आला तर फक्त कळवा. नागरिकांना केले आवाहन..
बुलढाणा, दि. २५ फेब्रुवारी: ‘स्वाभिमानी’ चे नेते रविकांत तुपकर यांनी आज (25 फेब्रु. 2021) बुलडाणा महावितरणचे अधिक्षक अभियंता दिपक देवहाते यांची भेट घेवून त्यांना शेवटचा अल्टीमेटम दिला. या काळात कोणत्याही ग्राहकाचे विज कनेक्शन कापाल तर याद राखा. संघर्ष अटळ आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना फटके बसतील. असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले.
महावितरणने सध्या विज कनेक्शन कापायचा सपाट लावला आहे. लॉकडाऊन काळातील विजबील माफ करायचे सोडून सध्या जबरदस्ती वसुली सुरू आहे. उर्जामंत्र्यांनी पहिले विजबिल माफीचे सूतोवाच केले व नंतर घूमजाव केला आणि आता जबरदस्ती वसुली सुरू आहे..! हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही..! असे रविकांत तुपकर यावेळी म्हणाले..
सध्या जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन आहे तर विजबिले भरणार कशी? यापुढे कुणीही विज कनेक्शन कापायला अधिकारी – कर्मचारी आला तर ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फक्त कळवा..असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले व जे कर्मचारी कनेक्शन कट करण्यासाठी येतील ‘त्या’ कर्मचारी – अधिकाऱ्यास ‘स्वाभिमानी’ स्टाईलने धडा शिकवू..! असा इशाराही तुपकरांनी यावेळी दिला..
Comments are closed.