Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाचा गडचिरोलीतील आदिवासी तरुणाची कथा, ज्याने स्किल कोर्सेस द्वारे गावातील तरुणांना केले प्रेरित,आता कमावतोय वर्षाला 60,000 हजार रुपये

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 29 जुले – वडिलांचे लहानपणी निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी निभावताना मल्टिस्किल कोर्स केला. आपल्या गावातील इतर आदिवासी तरुणांनाही कोर्स करायला प्रेरित केले आणि आज हीच गडचिरोलीतील तरुण बांधकामाचे एकत्र कंत्राट घेऊन वर्षाला 60,000 रुपये कमवत आहेत. ही कथा आहे गडचिरोलीतील येडसगोंडी गावात राहणाऱ्या अविनाश डुग्गा या आदिवासी तरुणाची.

अविनाश गडचिरोलीतील धानोरा ब्लॉक येथे येडसगोंडी गावात आपल्या आई आणि बहिणीसह राहतो. अविनाशवरच घराची जबाबदारी असल्याने त्याने 12 वी झाल्यावर कधी आपल्या तसेच दुसऱ्यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करायला सुरूवात केली. मात्र, यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने, महिन्याचा खर्च भागवणे अविनाशला जड झाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तेव्हात्याने युवा परिवर्तन संस्थेचा मल्टिस्कील कोर्स केला. आणि त्यात प्लबिंग, गवंडी काम ही कामे शिकला. हे शिकतानाच संस्थेमार्फत सुरु असेले कम्युनिटी सेंटर्स आणि शौचालये बांधायची कामे केली. यामुळे त्याला गवंडी कामाचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले. त्याच्यासोबत गावातील इतर 10-15 मुलांनीही हा मल्टिस्कील कोर्स केला आणि गवंडी काम शिकले. अविनाशने आपल्या गावातील इतर मुलांना एकत्र घेऊन गावातील छोटी मोठी गवंडी काम करायला सुरूवात केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 ”मी गवंडी काम शिकल्यावर माझ्या गावातील मुलांना गवंडी कामाचे महत्व समजावले. पहिल्यांदा आम्हाला कोणी काम द्यायचे नाही. मग छोटी काम करून आता आम्हाला मोठ्या कंपन्यांचे कंत्राट मिळत आहे. मला पुढे यातच काम करायचे आहे”

अविनाश 

 

अविनाश आणि त्यांच्या मित्रांचे काम आवडल्याने त्याला धानोरा ब्लॉक मधील इतरही गवंडी कामाची कंत्राट मिळायला सुरूवात झाली. नुकतेच अविनाशने एयरटेल कंपनीचा टॉवर लावायचे काम पूर्ण केले. अशा पध्दतीने ही आदिवासी मुले वर्षाला 60,000 रुपये कमावत आहेत.फक्त 12 वी शिकलेला अविनाश आज येगडगोंडी गावात मुला मुलींना प्रेरणा देत आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.