निर्यातीसाठी आंब्याची मँगोनेट प्रणालीने नोंदणी – ३१ मार्चपर्यंत नोंदणीची मुदत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १२ डिसेंबर : आंबा निर्यात करण्यासाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी युरोपियन युनियन व इतर देशांमध्ये केली जाते. यावर्षी ७ हजार ९४४ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागांच्या नोंदणीसाठी मँगोनेट ही ऑनलाईन प्रणाली नुकतीच १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी अपेडाने फार्म रजिस्ट्रेशन हे मोबाईल अॅप निर्माण केले आहे.
सदर अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करता येईल. यासाठी सर्व आंबा बागायतदारांनी सन २०२०-२१ साठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यासोबत संपर्क साधून त्वरित अर्ज करण्याचे आवाहन कृषी सहसंचालकांनी केले आहे. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी ५ वर्षांसाठी वैध असेल. त्यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी, नुतनीकरण करण्याची आवश्यकता नाही. नव्याने नोंदणी करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, सातबारा, ८ अ, बागेचा नकाशा आदी कागदपत्राची आवश्यकता आहे. मँगोनेटद्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ अशी आहे. निर्यातक्षम बागाची वेळेत नोंदणी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे.
Comments are closed.