Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन

पथसंचलनात पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ७ जानेवारी : दिनांक ०२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत पोलीस दलाकडुन विविध उपक्रम राबविले जातात. या निमीत्ताने आज दिनांक ०७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाचे पथसंचलन पार पडले.

सदरचे पथसंचलन हे गडचिरोली शहरातील कारगील चौकापासुन सुरु होऊन इंदीरा गांधी चौक ते बस स्थानक येथुन परत इंदीरा गांधी चौकात सांगता करण्यात आली. सदर पथसंचलनात पोलीस दलातील विविध शाखांनी सहभाग घेऊन महिला सुरक्षा, सायबर जनजागृती, वाहतुक नियम या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती केली. पथसंचलनामध्ये ध्वजवाहक, पोलीस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटुन, बँड पथक, शालेय विद्यार्थी, बुलेट प्लाटुन, श्वान पथक, बीडीडीएस पथक व एमपीव्ही वाहन यांनी बँड पथकाच्या देशभक्तीपर धुन वरती शिस्तबद्ध पथसंचलन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या पथसंचलनामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली, पोलीस स्टेशन गडचिरोली, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, विशेष अभियान पथक, सिव्हीक अॅक्शन, प्रोपागंडा, श्वान पथक, बीडीडीएस, सीटीसी, सायबर सेल, भरोसा सेल इ. शाखेतील अधिकारी व अंमलदार तसेच विद्याभारती कन्या हायस्कुल, फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, शिवाजी ज्युनियर सायन्स कॉलेज व महिला महाविद्यालय गडचिरोली येथील २५० विद्यार्थीविद्यार्थीनीनी आपला सहभाग नोंदविला.

सदर पथसंचलनामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल,  पोलीस अधीक्षक, अनुज तारे., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा स्वप्नील जाधव, प्रभारी अधिकारी, पोस्टे गडचिरोली अरविंद कतलाम व राखीव पोलीस निरिक्षक विठ्ठल मुत्यमवार हे उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा: 

पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावे – कमांडंट खोब्रागडे

 

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Comments are closed.