Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोहेकरांची प्रदीर्घ प्रतिक्षा संपली,रोहा दिवा नवीन गाडी रुळावर,रोहेकरांच्या एकजुटीचे फलित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रोहे, 22 नोव्हेंबर :- सकाळी पाच नंतर मुंबई कडे जाण्यासाठी एखादी रेल्वे गाडी उपलब्ध व्हावी ही गेली दोन दशके असलेली रोहेकरांची प्रदीर्घ प्रतिक्षा २२ नोव्हेंबर पासून संपली आहे. आता सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी रोहा दिवा गाडी अधिकृतरीत्या रेल्वे रुळावरून धावणार आहे. सोमवार ते शुक्रवार अशी ही गाडी उपलब्ध होणार आहे.

रोहेकरांसाठी वाढीव गाडी उपलब्ध व्हावी यासाठी सह्यांच्या मोहिमेद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्ष मैदानात उतरल्यानंतर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला बळ मिळाले.यासोबतच सुराज्य, सिटिझन फोरम या सामाजिक संघटनांचे पाठबळ मिळताच या मागणीला जनाधार मिळत गेला.अखेर रोहेकरांची या मागणीसाठी वाढत असलेली एकजूट लक्षात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने अधिकृतरीत्या या गाडीला हिरवा सिग्नल दिला आहे. त्यामुळे रोहेकरांच्या आनंदाला पारावार राहिला नसून आता अशीच एकजूट कायम ठेवत रद्द झालेल्या गाड्यांचे थांबे पुर्वत करत अधिकाधिक लांबपल्याच्या गाड्या थांबविण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा मानस मनसे रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांनी व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रोहा रेल्वे स्थानकावरील आधीच अपुरी त्यामध्ये कोरोना काळात बदललेल्या वेळापत्रकामुळे रेल्वे सेवा ही रोहेकरांसाठी गैरसोयीची ठरत होती.यामुळे रोहा सह निडी, नागोठणे, कासू या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक प्रवाश्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.प्रवाश्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेत महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघांतर्गत रोहा रेल्वे प्रवासी संघाने मध्य रेल्वे प्रशासन,स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे कडे निवेदने दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सह्यांची मोहीम हाती घेत प्रत्यक्ष मैदानावर येत रोहेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.अखेर त्यास यश येत २२ नोव्हेंबर पासून रोहा दिवा ही नवीन मेमु गाडी रोहेकरांच्या सेवेत रुजु झाली आहे.

गाडी नंबर ०१३५२ (रोहा दिवा ) हि रोहा वरुन सकाळी ६:४० वाजता सुटेल. गाडी नंबर ०१३५१ (दिवा रोहा )ही गाडी सायंकाळी ६:४५ वाजता दिव्यावरुन सुटेल व ती रात्री ९:१५ वाजता रोहा मध्ये पोहोचेल.ही गाडी सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस उपलब्ध राहणार आहे. शनिवार व रविवार या दिवशी ही बंद असेल.या गाडीचा निश्चितच रोहेकरांसाठी फायदा होणार आहे.यासोबतच नेत्रावती, दिवा सावंतवाडी या रद्द झालेल्या गाड्यांचे थांबे पुर्वत करत दैनंदिन धावणाऱ्या जलद गाड्यांचे थांबे दिल्यास रोहेकरांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकारक व आर्थिकदृष्ट्या परवडणारा होईल. रोहा दिवा गाड्यांना कोरोना काळात दिलेला विशेष दर्जा रद्द करून तिचे तिकीट पुर्वत करणे व अन्य गाड्यांचे थांबे मिळावेत यासाठी आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला लढा रोहेकरांच्या साथीने सुरुच ठेवणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

धक्कादायक : प्रेयसीला मिठी मारून प्रियकराने घेतले जाळून..दोघेही गांभीर जखमी…

कर्तव्यात कसूर… महिला पीएसआय निलंबित

Comments are closed.