Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रूकसार मुस्ताक शेख यांचा सत्कार – राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे

आशा वर्कर म्हणून रूकसार शेख यांनी राज्यातून सातवा क्रमांक पटकाविले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १५ डिसेंबर:- नजीकच्या महागाव आरोग्यवर्धिनी केंद्रातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका रूकसार मुस्ताक शेख यांना राज्यातून सातवा क्रमांक मिळाला. हे गडचिरोली जिल्हा व अहेरी तालुका वासीयांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब असून याची दखल घेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आशा वर्कर रूकसार मुस्ताक शेख यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार केले.
सोमवार १४ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे स्थानिक भगवंतराव महाविद्यालयात “प्रतिभावंत गुणगौरव” या कार्यक्रमा अंतर्गत रूकसार मुस्ताक शेख यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्ह्याचे महिला निरीक्षक शाहीन भाभी हकीम यांच्या शुभहस्ते रूकसार मुस्ताक शेख यांचे भावपूर्ण सत्कार करण्यात आले.
रूकसार मुस्ताक शेख यांनी आशा योजनेच्या कार्यासोबतच कोरोनासारख्या प्रादूर्भावात उत्कृष्ट कामगिरी केले असून राज्यशासनाने ठरवून दिलेले “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या सर्व्हेमध्ये उद्दिष्टे चोखपणे वेळेवर पूर्ण केल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी यादी जाहीर केले असून महागाव आरोग्य वर्धिनी केंद्रातील आशा स्वयंसेविका रूकसार मुस्ताक शेख यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला, त्यामुळे आशा वर्कर रूकसार मुस्ताक शेख यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाने भावपूर्ण सत्कार करून गौरविले.
सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आशाताई पोहणेकर, आशा वर्करचे गटप्रवर्तक रमादेवी समुद्रालवार, श्रीनिवास विरगोनवार, शैलेश पटवर्धन, मुस्ताक शेख, ममता पटवर्धन आदी आणि शिक्षिका व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.