प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी रुपराज वाकोडे, तर सचिवपदी अरविंद खोब्रागडे यांची निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १४ डिसेंबर : पत्रकारांची संघटना असलेल्या गडचिरोली प्रेस क्लबच्या 13 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी रुपराज वाकोडे, तर सचिवपदी अरविंद खोब्रागडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रेस क्लब भवन येथे पार पडलेल्या बैठकीत प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी नवनियुक्त अध्यक्ष रुपराज वाकोडे यांच्याकडे पदभार सोपवला.
नव्या कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी मनोज ताजने, सहसचिव निलेश पटले व कोषाध्यक्षपदी अविनाश भांडेकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, नंदकिशोर काथवटे, सुरेश नगराळे, अनिल धामोडे, शेमदेव चाफले, विलास दशमुखे, मिलिंद उमरे यांचा समावेश आहे. बैठकीत नवीन कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments are closed.