Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

साईनाथ औतकर यांचा भाजपला रामराम आविस मध्ये जाहीर प्रवेश.

जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केला सत्कार.

अहेरी, दि. ४ डिसेंबर: अहेरी येथील भारतीय जनता पार्टीचे माजी अहेरी तालुका महामंत्री साईनाथ औतकर यांनी भाजपाला रामराम करून आदिवासी विद्यार्थी संघामध्ये जाहीर प्रवेश केला.

आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जि. प. अध्यक्ष  अजय कंकडालवार यांच्या अहेरी येतील जनसंपर्क कार्यालयात सदर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. नवनिर्वाचित कार्यकर्त्याच्या जि. प. अध्यक्ष  अजय कंकडालवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, आविसचे सल्लागार अशोक येलमूले, आविसचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, अमोल अलोने, सुरेश दुर्गे, श्याम ओंडरे, मिलिंद अलोने, शिवराम पूल्लूरी, कार्तिक तोगम, दिपक संगमवार, प्रकाश दुर्गे, विपुल गर्गम व काँग्रेस व आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

क्रिकेटचा खेळ मांडला कार्यालयीन वेळेत कार्यालया समोर. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित असलेल्या अल्लापल्ली विभागीय कार्यालयातील धक्कादायक प्रकार.

Comments are closed.