संतांनी समाज जोडण्याचे आणि माणूस घडविण्याचे काम केले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 23 डिसेंबर : संतांनी समाज जोडण्याचे; समाज एकत्र करण्याचे काम केले. जात धर्म पंथ भेद विसरून माणूस म्हणून सारे एक आहेत हे विचार शिकवून संत साहित्याने माणूस घडविण्याचे काम केले असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले. जुहू येथील नोव्हाटेल हॉटेल मध्ये वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित नवव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ना रामदास आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी हभप चकोर बाविस्कर महाराज होते. तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर; पार्श्वगायक सुरेश वाडकर; विठ्ठल पाटील ;चैत्यन्य महाराज कबिरबुवा; भागवत महाराज शिरवळकर ;रामेश्वर महाराज शास्त्री; कृष्णा महाराज लांबे; पाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समतावादी मानवतावादी विचार मांडला आहे. तोच विचार संत साहित्यात आहे.त्यामुळे संत साहित्य हे माणसाला माणसाशी जोडणारे साहित्य आहे.संतांनी आणि आता हभप असणाऱ्या किर्तनकारांच्या हातून समाज जोडण्याचे मानवतावादी विचाराचा प्रसार करून माणूस घडविण्याचे ;समाज परिवर्तनाचे काम होत आहे.संत साहित्य घराघरात पोहोचले पाहिजे.समाजातील अनिष्ट प्रथा दूर करणारे संत साहित्य सर्वांनी वाचले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
Comments are closed.