गोंडवाना विद्यापीठात क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना अभिवादन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 9 जून- गोंडवाना विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. नंदकिशोर मने,प्रा. डॉ. प्रफुल्ल नांदे, प्रा.शिवाजी चेपटे, गणित विभाग तसेच सीनेट सदस्य सतीश पडोळे, व शशिकांत कुळमेथे उपस्थित होते.
या प्रसंगी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.पदव्युत्तर शैक्षणिक विभागाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठातील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. नंदकिशोर मने होते.
हे पण वाचा :-
Comments are closed.