संजय राऊत कृषी कायद्यांच्या विरोधात राज्यसभेत एक शब्दही बोलले नाहीत:भागवत कराड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना डेस्क १५ डिसेंबर:- केंद्र सरकार कृषी कायद्या बाबत आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे.मात्र आंदोलक हे कायदे रद्द करण्याच्या मागणीवर कायम असून आंदोलकांची भूमिका अडेलतट्टू आहे.लोकशाही असल्याने शेतकऱ्यांचं हित या कायद्यात आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे कायदे रद्द होणार नाही असं भाजपचे राज्यसभेतील खासदार भागवत कराड यांनी म्हटलं आहे.ते जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.कृषी कायदयाची जनजागृती करण्यासाठी आज जालन्यात भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कराड यांनी हा आरोप केला.
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्या विरोधात शिवसेनेचे नेते संजय राऊत राज्यसभेत एक शब्दही बोलले नाहीत.राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी फक्त शरद पवार यांचा या कायद्या बाबत सल्ला घेतला असता तर बरं झालं असतं एवढंच बोलले असा आरोप भाजपचे राज्यसभेतील खासदार भागवत कराड यांनी केला आहे.
यावेळी जालना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सोबत भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,भाजप प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे,जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुले, भाजप शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचो उपस्थिती होती.
Comments are closed.