Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र सिमलेस कंपनीला सरपंचांचा अभय? ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रोहा:  गेल्या काही दिवसांपासून ऐनघर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र सिमलेस कंपनीसंदर्भात मोठी खळबळ उडाली आहे. मागील सरपंच अर्चना भोसले यांनी कंपनीची मोजणी लावली होती. मात्र, नव्या सरपंचांनी ती प्रक्रिया अचानक थांबवत कंपनीला अभय दिल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

ग्रामस्थांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत यामागील नेमके कारण काय, याचा जाब विचारला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, मोजणीद्वारे कंपनीच्या हद्दीचा आणि बेकायदेशीर भूवापराचा तपास केला जाणार होता. मात्र, ती प्रक्रिया थांबविल्यामुळे कंपनीला सरळसरळ फायदा होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सात कोटींच्या थकबाकीचा मुद्दा प्रलंबित

महाराष्ट्र सिमलेस कंपनीवर तब्बल सात कोटी रुपयांचा कर बाकी आहे. हा कर ग्रामपंचायतीला मिळणे अपेक्षित असताना, तो वसुलीबाबत कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कराच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद करता आली असती, पण कंपनी आणि प्रशासनाच्या संगनमतामुळे ग्रामपंचायत हक्काच्या रकमेपासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सरपंच आणि कंपनी यांचे संबंध संशयास्पद?

सरपंच आणि कंपनी यांच्यात काही संगनमत आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पूर्वी सुरु झालेली प्रक्रिया अचानक बंद का केली गेली? ग्रामस्थांचा आरोप आहे की, काही प्रभावशाली लोकांच्या दबावामुळे हे घडले असावे. जर मोजणीमध्ये काही गैरव्यवहार आढळले असते, तर कंपनीवर कायदेशीर कारवाई झाली असती. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार अत्यंत संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

ग्रामस्थांचा इशारा: आंदोलनाचा पवित्रा

या संपूर्ण प्रकरणावर ग्रामस्थांनी आता लढ्याचा इशारा दिला आहे. जर त्वरित मोजणी प्रक्रिया सुरू करून कर वसुलीबाबत कार्यवाही झाली नाही, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या मुद्द्यावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी देखील होत आहे. सरपंच आणि कंपनीच्या कारभाराबाबत आता चौकशी होणार का? आणि ग्रामस्थांना न्याय मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.