चंद्रपूरात सुरु होणार अनुसुचित जमातीचे जात पडताळणी केंद्र. आ.किशोर जोरगेवार यांच्या पाठपूराव्याला यश.
राज्य सरकारने दिली मंजूरी, गैरसोय टळणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपुर, दि 28 नोव्हेंबर: चंद्रपूर जिल्हात अनुसुचित जमातीच्या नागरिकांचे मोठ्या संख्येत वास्तव्य आहे. मात्र येथे जात पडताळणी केंद्र नसल्याने येथील अनुसुचित जमातीच्या नागरिकांना गडचिरोली येथे जावे लागत होते. त्यामूळे हे प्रमाणपत्र काढणे नागरिकांना त्रासदायक झाले होते. विदयार्थी, शिक्षक, शासकीय नौकरदार, नागरिक, व निवडणूक लढविणारे उमेदवार यांची गैरसोय लक्षात घेता सदर जात पडताळणी केंद्र चंद्रपूरात सुरु करण्यात यावे हा विषय
आ. किशोर जोरगेवार यांनी लावून धरला होता. या संदर्भात जोरगेवार यांनी आदिवासी मंत्री के. सी पाडवी, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह संबधित विभागाशी पत्रव्यहार केला होता व सातत्याने पाठवूरावा सुरु होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानूसार अनूसूचित जमातीचे जात पडताडणी केंद्र चंद्रपूरात सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याचा मोठा फायदा येथील नागरिकांना होणार आहे.
Comments are closed.