शाळा बंद; ऑनलाईन शिक्षण कसे घ्यावे? विद्यार्थांच्या पत्राची दखल, हायकोर्टाची नोटीस
शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण, गडचिरोली जिल्ह्यातील विध्यार्थाना वेगळीच समस्या भेडसावत आहे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १७ डिसेंबर: कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण, गडचिरोली जिल्ह्यातील विध्यार्थाना वेगळीच समस्या भेडसावत आहे. जिल्ह्यात विजेचा पुरवठा नियनमित होत नाही. तसेच इंटरनेटही नाही. अशा परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण कसे घ्यावे? असा प्रश्न उपस्थित करणारे पत्र काही पालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय न्यायमूर्तींना लिहिले आहे. या पत्राची दखल घेऊन खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
याप्रकरणी खंडपीठाने केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय आणि राज्याच्या शालेय विभागाच्या सचिवांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आता शाळांमधून ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहे. या जिल्ह्यात अनेक दिवस वीजपुरवठा नसतो. शिवाय मुलांकडे उपकरण असल्यास इंटरनेटची सुविधा नाही. अशा परिस्थितीत मुलांनी ऑनलाईन शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न नागपूर खंडपीठाला पाठवलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.
Comments are closed.