Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माळीण दुर्घटनेला सात वर्षे पूर्ण!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क ३० जुलै: माळीण  दुर्घटनेला सात वर्षे पूर्ण झाले असून या दुर्देवी दुर्घटनेत ४४ कुटूंबातील १५१ लोक दगावले गेले होते. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. यावर्षी माळीण प्रमाणे कोकणात तळीये गावात व इतर ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने माळीणच्या आठवणी अजूनच ताज्या झाल्या आहेत .

सतत रात्रभर पडलेल्या पावसामूळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा ३० जुलै २०१४ रोजी कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदात संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि ४० कुटूंबातील १५१ लोक ढिगाऱ्याखाली सापडून मयत झाले. यातील ९ लोक जखमी अवस्थेत सापडले तर ३८ लोक बाहेरगावी कामानिमीत्त गेल्याने वाचलेहोते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शासकिय यंत्रणेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढगाऱ्याचे खोदकाम केले व १५१ मृतदेह बाहेर काढले. शासनाकडून मयतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्ति मागे ८.५० लक्ष रूपये देण्यात आले आणि  विविध योजनांमधून मदत करण्यात आली होती .

त्यानंतर दुर्घटना घडल्यानंतर अडीच वर्षात कायमस्वरूपी पुनर्वसन करून देण्यात आले होते. या नविन गावात ६८ घरे बांधण्यात आली असून सर्व बारा मुलभूत सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
नविन माळीणचा अजूनही कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटला नाही. गावात सर्व सुखसोई झाल्या परंतु पिण्याच्या पिण्याचा सर्वांत मोठा प्रश्न अजूनही सात वर्षे झाली तरी सुटला नाही. तसेच उर्वरीत सर्व लोकांना घरे मिळावीत, स्मृतीस्तंभावर सावलीसाठी पत्र्याचे शेड व्हावे, हनुमान मंदिरा समोर सभामंडप व्हावा अशा काही मागण्या अजूनही प्रलंबीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोकण, पश्चिम महाराष्टात दरवर्षी पावसाळयात दरड कोसळून जिवीत व वीत्तहानी होत असल्याच्या घटना घडत आहेत. माळीण घडल्यानंतर पुणे जिल्हयातील धोकादायक गावे निश्चीत करून येथे तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या. तसेच या गावांचे कामयस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चीती व इतर कामे शासनाकडून सुरू आहेत. अशाच प्रकारे राज्यातील धोकादायक गावे निश्चीत करून याचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची आवश्यकता आली आहे.

शासनाने माळीणचे पुनर्वसन अतिशय कमी वेळात  सुंदर केले .

माळीण दुर्घटना ३० जुलै २०१४ रोजी घडली तर दि.१ एप्रिल २०१७ रोजी माळीण गावाचा लोकार्पण सोहळा झाला. राज्याचे गृहमंत्री व आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील व विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या कल्पकतेतून व प्रयत्नामूळे माळीण उभे राहिले. माळीण सारखे काम कोकण व पश्चिम महाराष्टातील डोंगराच्या तळाला वसलेल्या गावांमध्ये झाल्यास भविष्यकाळीत जीवतहानी टळणार आहे.

आता शासनाला माळीण प्रमाणे तळीये गावाचे पुनर्वसन करावे लागणार आहे. तळीयेचे पुनर्वसन करताना माळीण मध्ये केलेल्या कामाचा निश्चीत उपयोग होणार आहे. माळीण पुनर्वसनात ६७ घरे व १८ मुलभूत सेवासुविधा देण्यात आल्या. या नविन जागेवर पुन्हा माळीण सारखी घटना घडू नये यासाठी जागा सपाटिकरण करणे व संरक्षण भिंती बांधणे हे काम तांत्रिकदृष्टया करण्यात आले. घरे देखिल आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भुंकपरोधक , कमी खर्चात उपयोगी अशी बांधण्यात आली. तसेच शाळा, जनावरांचा गोठा, समाजमंदिर, ग्रामपंचायत अशा सर्व आवश्यक इमारती येथे बांधण्यात आल्या. यातून अतिशय टुमदार, हिल स्टेशन सारखे नविन माळीण उभे राहिले.

माळीण दुर्घटनेच्या ठिकाणी  ३१ जुलै २०१४ रोजी शरद पवार यांनी भेट देऊन केली होती सूचना !

माळीण दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी दि.३१ जुलै २०१४ रोजी शरद पवार आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, कोकण व पश्चिम महाराष्टात अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत. माळीण दुर्घटने प्रमाणे येथेही अशा घटना घडू शकतात. माळीण मधून आपण बोध घेवून बाकी ठिकाणच्या दुर्घटना रोखण्यासाठी या गावांचे पुनर्वसन अथवा येथे बचावात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्यशासनाने याबाबत विचार करावा, याला विरोध होईल. मात्र भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेणे आवश्यक आहे असे सांगितले होते. आज त्यांचे म्हणणे खरे ठरत आहे. धोकादायक गावे निश्चीत करून त्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे.

हे  सुधा वाचा

आठ लाख बक्षीस असलेल्या जहाल नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण

सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग केला बंद; नक्षली पत्रके आढळली

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची फसवणूक; जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Comments are closed.