Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं, त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली.लाज वाटली पाहिजे – तानाजी सावंत

मुख्यमंत्री या एका पदासाठी, विकास,हिंदुत्व ,शिवसेना,आणि शिवसैनिक वाऱ्यावर सोडले- तानाजी सावंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड 20 सप्टेंबर :- गद्दार कोण..? आमचं तर सोडा ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली लाज वाटली पाहिजे. अस म्हणत मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे वर जहरी टीका केली. बीडमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना तानाजी सावंत म्हणाले की तुम्ही म्हणता माझ्या बापाचा फोटो लावायचा नाही माझ्या शिवबाचा फोटो लावायचा तुम्हाला काय अधिकार आहे? महात्मा गांधी असतील बाळासाहेब असतील आनंद दिघे तुळजाभवानी यांचे फोटो लावा आणि जाऊ नका म्हणण्याचा काय अधिकार आहे? आज खऱ्या अर्थाने शिवसैनिकाला यांची बौद्धिक क्षमता काय हे कळलं. गेल्या 20 वर्षापासून संसार मोडीत काढून कुठल्या माणसाच्या हाताखाली काम करत होतो. हे फक्त सर्वसामान्य शिवसैनिकाचे रक्त सोसायचे काम करत होते फक्त लेना बँक होती देणं माहीत नव्हतं.

आम्हाला परत डिवचाल तर 50 खोक्याचा अर्थ काय असतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत सांगू शकतात.आमच्या तोंडातून वदवून घेऊ नका.आम्हाला बोलू देऊ नका तात्कालीन पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला विनंती करतो.विकास सोडला हिंदुत्व सोडले,शिवसेना सोडली,शिवसैनिक रस्त्यावर सोडला आणि फक्त मुख्यमंत्री या एका पदासाठी.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी एका शिवसैनिकला मुख्यमंत्री करणार होते. मग अडीच वर्षात खरा शिवसैनिक एकच आहे तो म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री असे ते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.