Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरात शंकर-पार्वती विवाह उत्सव.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर, दि. १६ नोव्हेंबर : श्री. गौरा -गौरी उत्सव मंडळातर्फे स्थानिक विनोबा भावे नगर येथील गांधी चौकामधील गल्ली क्र. ३० मध्ये शंकर-पार्वती विवाह उत्सव साजरा करण्यात आला.
कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला हा उत्सव छत्तीसगडी समाजात साजरा करण्यात येतो. त्यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक सहसभागी होतात. हा उत्सव दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुरू होतो. सायंकाळी लोक गावाच्या बाहेर जाऊन एका ठिकाणी पूजा करतात. तेथील माती जमा करून त्या मातीच्या शिव व पार्वतीच्या (गौरा, गौरी) मूर्ती तयार करतात. गौरा म्हणजे शिव हे बैलावर आणि गौरी म्हणजे पार्वती कासवावर बसून प्रवासाला जातात. त्यानंतर रात्री लक्ष्मीपूजन करण्यात आल्यावर गौरा व गौरी यांचा देखावा रस्त्यावरून काढण्यात येतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


हा उत्सव दिवाळीनिमित्त साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाला मंडळाचे डे कुमार साहु, लोकनाथ साहु, गंगा गणेश नेताम, तिलक साहु, धनराज साहु, महेश साहु, शत्रुघ्न साहु, मुकेश देवांगन, सुंदर साहु, आकाश साहु, तेजराम साहु आदी उपस्थित होते.

Comments are closed.