तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमधील बचावलेल्या दोन मुलांना शिवसेनेने घेतले दत्तक
- ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती
- खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातुन 10 लाखाची मुदत ठेव आणि शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार
ठाणे, दि. १५ फेब्रुवारी: गतवर्षी ऑगस्ट महिन्यात महाडमध्ये घडलेल्या तारीक इमारत दुर्घटनेत बचावलेल्या महोमद बांगी, अहमद शेखनाक या दोन मुलांना आज खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमार्फत दत्तक घेण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते दोन मुलांना प्रत्येकी दहा लाख रूपयांच्या मुदत ठेवीचे सर्टीफिकेट आणि पुढील शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचा शब्द खा. शिंदे यांनी दिला. या दोन मुलांपैकी एका मुलाची ॲडमिशन पाचगणीच्या शाळेत केली असल्याची माहिती हि खा. डॉ. शिंदे यांनी दिली. या इमारत दुर्घटनेच्या वेळी जीवावर उदार होऊन लोकांचे प्राण वाचवताना कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या नवीद दुस्ते याचा मुलगा नयन दुस्ते याच्या शिक्षणाची जबाबदारी महाडचे आमदार भरत गोगावले यांनी घेत असल्याचे जाहीर केले. इमारत दुर्घटनेत मदत कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचा सत्कार हि यावेळी करण्यात आला. या इमारत दुर्घटनेच्या वेळी ना. एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता त्याची हि वचनपुर्ती असल्याचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
Comments are closed.