Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आता शिवसेनेतच ‘मशाल ‘ विरुद्ध ‘ढाल तलवार’ असा रंगणार सामना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नवी दिल्ली, दि. ११ ऑक्टोंबर :  केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटाला ‘ढाल’ तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत आता मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना रंगणार आहे. ढाल-तलवार चिन्ह मिळाल्याने शिंदे गटातील नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे

शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्ह पाठवले होते. यात १) तळपता सुर्य २) ढाल-तलवार आणि ३) पिंपळाचं झाड हे तीन पर्याय शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे पाठवले होते. या तीन पर्यायांपैकी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिले आहे. काल, सोमवारी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे  यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सुरुवातीला त्रिशुल, उगवता सुर्य आणि गदा ही चिन्ह मिळावी अशी मागणी केली होती. तर ठाकरे गटाने त्रिशुल, उगवता सुर्य, गदा आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने दोन्ही गटांची धार्मिक चिन्ह फेटाळली होती. तर दुसरीकडे दोन्ही गटांनी त्रिशुल आणि उगवता सुर्य ही सारखी चिन्हे सादर केली होती त्यामुळे ही चिन्हे रद्द करण्यात आली होती.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी आ. दीपकदादा आत्राम यांची प्रशासनाला निवेदन देवून वेधले लक्ष .

 

महाराष्ट्राला मिळणार पुन्हा सर्वोच्च मान .

 

 

Comments are closed.