Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! बहिणी सोबत शाळेच्या आवारात खेळायला गेलेल्या ६ वर्षीय विद्यार्थ्यांचा खुन..

Get real time updates directly on you device, subscribe now.

१२ तासात आरोपी अटक

करणी करून म्हशीला मारल्याचा बदला घेण्यासाठी सहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बीड, दि. ५ फेब्रुवारी: बहिणी सोबत शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या 6 वर्षीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यु ने खळबळ उडाली होती. बीड जिल्ह्यातील रत्नागिरी गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरनाचा अवघ्या १२ तासात बीड पोलिसांंनी छडा लावत आरोपीला अटक केली आहे म्हैसीला करणी करून मारल्याचा बदल घेण्यासाठी ६ वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासत समोर आलं आहे या प्रकारणी भावकितील पतिपत्नीला अटक केली असून गुन्हा कबुल केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बीड तालुक्यातील रत्नागिरी गावच्या शाळेत आवारात ६ वर्षीय बालकाचा काल मृतदेह आढळून आला होता .या प्रकरणी कुटुंबियांनी घातपाताचा आरोप केला होता.नेकनूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने करीत प्रकरणाचा उलगडा केला असून करणीच्या संशयातून ‘ त्या ‘ बालकाचा खून झाले असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. नेकनूरपासून जवळ असलेल्या रत्नागिरी येथील शुभम ( उर्फ धर्मराज ) सपकाळ या ६ वर्षीय बालकाचा मृतदेह काल जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळून आल्याने खळबळ उडाली होती काल रात्री उशिरा अहवालातून त्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले होते . सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने करत सपकाळ यांच्या भावकीतील रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याला ताब्यात घेतले . यावेळी या दोघांनीही जुन्या भांडणातून ‘ त्या ‘ बालकाचा खून केला असल्याचे सांगितले . ‘ आमच्या म्हैसीला करणी करून तिला ठार मारण्यात आले होते आणि त्याचा बदला म्हणून आम्ही त्याला ठार मारले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले . रोहिदास सपकाळ यांचे घर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असून बुधवारी शुभम शाळेत खेळण्यासाठी आला असता लपाछपी खेळताना त्याला उचलून रोहिदास यांनी स्वत : च्या घरामध्ये नेले आणि तिथेच त्याचा गळा आवळून खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आणून टाकला असल्याची कबुली आरोपीने दिली आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी दिली तसेच पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितले

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.