Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिंधुदुर्ग: मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदुर्ग, दि. २३ फेब्रुवारी: जिल्ह्यात सर्व नगरपालिका, पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारण्यात येईल तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाच्या नियम

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लग्न समारंभासारख्या कार्यक्रमामध्ये 50 एवढ्याच मर्यादित लोकांची उपस्थिती
अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांनीच उपस्थितीती.

जिल्ह्यात कोरोना तपासणीचे प्रमाण वाढवण्यात यावे. कोविड केअर सेंटर्स कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने तसेच गृह अलगीकरण याविषयी काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

परराज्यातून विशेषतः राजस्थान, दिल्ली, गोवा, गुजरात आणि केरळ या राज्यांमधून येणाऱ्या लोकांची माहिती नागरिकांनी तातडीने प्रशासनास द्यावी.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी सदर माहिती जमा करून दररोज जिल्हा प्रशासनास सादर करावी.

या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी व चाचणीचा अहवाल येई पर्यंत सदर व्यक्ती गृह अलगीकरणात राहतील याबाबत दक्षता घ्यावी.

त्यासाठी पोलीस, ग्रामप्रशासन विभाग यांनी एकत्रित काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

सध्या महाविद्यालये सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमिवर महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचीही कोरोना तपासणी करण्यात यावी.

जत्रांच्या बाबत मंदिरांचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांच्याही तपासण्या करण्यात याव्यात. लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी होईल असे नियोजन करण्यात यावे.

जिल्हाधिकारी यांनी जत्रेच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहनही केले.

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लोकांनी गाफिल न राहता कोरोनाचे नियम पाळावेत.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा फैलाव कमी होत आहे. त्यामुळे नागरिक गाफिल झाले आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने नियमांची कडक अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

वैयक्तिक मागण्यांकरिता उपोषण, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको यासारखी आंदोलने सुरळीत पार पाडून  कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यात जातीस सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी  यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व भूभागात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) 4 ते (फ) आणि 37 (3) प्रमाणे दि. 13 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2021 अखेर मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहील. याची जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.

Comments are closed.