आत्तापर्यंत जिल्हयात 82 हजार कोरोना चाचण्या, पैकी 9 टक्के अहवाल सकारात्मक.
गेल्या चोवीस तासात 74 नवीन बाधित तर 61 जण कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली , दि.23 नोव्हेंबर : जिल्हयात आत्तापर्यंत कोरोनाची साथ आल्यापासून तब्बल 82910 संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ 9.08 टक्के म्हणजेच 7530 जण कोरोना बाधित आढळून आले. संशयितांच्या चाचण्या वेळेत करून संदर्भ सेवा दिल्याने जिल्हयातील बाधितांचे प्रमाण आटोक्यात राहिल्याचे जिल्हयात चित्र आहे. राज्यात सर्वात कमी रूग्णसंख्या गडचिरोली जिल्हयाची आहे. तसेच राज्यात सर्वात कमी मृत्यूदरही गडचिरोली जिल्हयाचा आहे. सद्या मात्र पून्हा काही प्रमाणात रूग्ण संख्या वाढत असल्याची परिस्थिती जिल्हयात आहे. त्यामूळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणेबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. मास्क लावणे, गर्दी टाळणे याबाबत सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
तसेच गेल्या चोवीस तासात जिल्हयात 74 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर 61 जणांनी कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7530 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6765 वर पोहचली. तसेच सद्या 690 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 75 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.84 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 9.16 टक्के तर मृत्यू दर 1 टक्के झाला.
नवीन 74 बाधितांमध्ये गडचिरोली 37, अहेरी 4, आरमोरी 18, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 1, एटापल्ली 5, कोरची 1, कुरखेडा 4, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या 61 रूग्णांमध्ये गडचिरोली 22, अहेरी 21, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 1, धानोरा 9, एटापल्ली 3, मुलचेरा 2, सिरोंचा 0, कोरची 1, कुरखेडा 1 व वडसा मधील 1 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील कन्नमवार वार्ड 3, ग्रामपंचायत नवेगाव 2, शिवाजी नगर 1, पंचवटीनगर 1, नवेगाव 1, चामोर्शी रोड 2, स्थानिक 20, गोकुलनगर 1, गांधी वार्ड 1, नर्सींग ट्रेनिंग सेंटर 1, वनश्री कॉलनी 3, शास्त्री नगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, आलापल्ली 1, बजरंग चौक वार्ड नं. 06, 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 16, वैरागड 1, परसवाडी 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये घोट 1, आंबेडकर चौक, आष्टी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये जारावंडी 3, भापडा 1, कसनसुर 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये येंगलखेडा 1, सोनसरी 1, पुराडा 2, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये सुंदरनगर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0 , तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.
Comments are closed.