Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

साउथचे सुपरस्टार कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन

साउथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबुचे होते वडील

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 15 नोव्हेंबर :-  साउथचे सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हैद्राबाद येथील खासगी रूग्णालयात मंगळवारी पहाटे 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा घट्टामनेनी यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी हे प्रसिध्द तेलुगू अभिनेते होते. त्यांना इंडस्ट्रीत सुपरस्टार कृष्णा म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. तेलंगानाचे मुख्यमंत्री यांनी कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दोन महिन्यांपूर्वी महेश बाबु यांच्या आईचे निधन झाले होते.

महेश बाबुचे वडील कृष्णा हे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचे मोठे स्टार होते. कृष्णा यांचे खरे नाव घट्टामनेनी शिव रामा कृष्णमुर्ती आहे. चित्रपटसृष्टीत आल्यावर त्यांनी कृष्णा हे नाव ठेवले. अदुर्थी सुब्बा राव दिग्दर्शित ‘थेने मनसुलू’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात केली. आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 350 चित्रपटांमध्ये काम केले. कृष्णा यांना पद्मविभूषण ने ही गौरविण्यात आले आहे. कृष्णा घट्टामनेनी यांनी पद्मालय फिल्म्स नावने स्वत:चे प्रोडक्शन हाउस सुरू केले होते. या प्रोडक्शन हाउस अंतर्गत त्यांनी अग्निपरिक्षा, अल्लुरी सीमाराम राजू, मोसागल्लाकू मोसागडू पंडंती कपूरम, देवुडू चेसिना मनुशुलु आणि अल्लुरी सीताराम राजू यासारखे अनेक चित्रपट बनवले. काही काळानंतर त्यांनी त्यांची दुसरी पत्नी विजया निर्मला यांच्यासोबत विजय कृष्णा चित्रपट ही दुसरी चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली. मीना आणि देवदासू, अल्लुरी सीतारामराजू आणि मोसागल्लाकी मोसागडू सारख्या काही संस्मरणीय नाटकांना त्यांनी आर्थिक मदत केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कृष्णा हे उत्कृष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक यासोबतच राजकारणीही होते. प्रसिध्द कारकीर्दीनंतर कृष्णा यांनी डिसेंबर 2012 मध्ये चित्रपट व राजकारण या दोन्हीतून निवृत्ती घेतली. पद्मभूषण, एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार आणि आंध्र विद्यापीठातून डाॅक्टरेट सारख्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. दरम्यान हे वर्ष महेश बाबूसाठी कठीण होते. या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा भाउ रमेश बाबू यांचे निधन झाले. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी त्यांची आई इंदिरा देवी यांना गमावले होते.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.