Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

३ जून रोजी ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई व नागपूर येथील विशेषज्ञ करणार वैद्यकीय तपासणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 2 जून-  धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई व नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने शनिवार ३ जून २०२३ रोजी वेदना व्यवस्थापन ओपीडी, पोटविकार ओपीडी व बालरोग शस्त्रक्रिया ओपीडीचे आयोजन केले आहे.

 वेदना व्यवस्थापन ओपीडी करीता मुंबईचे प्रसिद्ध डॉ. जितेन्द्र जैन व सहकारी डॉक्टरांची टीम तपासणी करीता येणार आहे. या ओपीडी मध्ये पाठीचा कणा दुखणे, पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे, मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे या सर्वांचा उपचार होईल. तसेच पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, आतडी आणि मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे, टाचेचे दुखणे, डोकेदुखी यामुळे होणार्‍या वेदना व तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या वेदना या सर्वांवर उपचार होईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोटविकार ओपीडी करीता नागपूर येथील  पोटविकार तज्ञ डॉ.सिद्धार्थ धांडे यांच्या सहकार्याने पोटविकार ओपीडीमध्ये तपासणी करतील. पचनसंस्थेशी निगडीत विकाराचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी उपचार केल्या जातील.  पोटातील अल्सर, गिळण्यामध्ये अडचण व वेदना होणे, पित्ताशयातील खडे, छातीत जळजळ, पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, शौचातून रक्त पडणे, कावीळ (पांढरी व पिवळी ) रक्ताची उलटी, असामान्य आतड्याची हालचाल,मळमळणे,आतड्या मधील सुज,पातड शौच, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज,पोटात पाणी ही या रोगाची लक्षणे असू शकतात या सर्वांवर उपचार होईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 बालरोग शस्त्रक्रिया ओपीडी करीता नागपूर येथील डॉ. प्रतिक राउत ओपीडीमध्ये तपासणी करतील. लहान मुलांच्या सर्जरी संबंधित आजार जसे हर्निया, हायड्रोसिल, हायपोस्पेडियास, अंगावरील गाठी या सर्वांवर उपचार व मार्गदर्शन केल्या जाईल. तरी या सर्व विशेषज्ञ ओपीडीचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात येत आहे.
हे पण वाचा :-
https://youtu.be/z9j71PRa9ns

Comments are closed.