आलापल्लीत विद्यार्थांनी रॅली काढून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाविरोधात केली जनजागृती
अहेरी पोलीस व मुक्तीपथचा उपक्रम
अहेरी, दि.१० जानेवारी: पोलीस स्टेशन व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने व्यसनमुक्त संकल्प रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री बंद करण्याचे आवाहन केले.
राणी दुर्गावती विद्यालय तथा सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थांनी रॅली काढून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाविरोधात जनजागृती केली. तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची पानठेला धारकांना विनंती केली. सदर रॅली आलापल्ली येथील चौकातून काढून मुख्य रस्त्याने भ्रमण करीत तंबाखू विरोधी नारेबाजी करण्यात आले. दरम्यान प्राचार्य गजानन लोनबले यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम सांगत मुलांना व पालकांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन केले. एपीआय शिंदे यांनी अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देण्याचे सांगितले. मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण यांनी मुलांना व्यसन व व्यसनापासून होणारे दुष्परिणाम सांगत व्यसनमुक्तीची शपथ दिली.
Comments are closed.