राज्याच्या पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि. 6 सप्टेंबर 2022: राज्याच्या पद्म पुरस्कार शिफारस समितीची पुनर्रचना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.
केंद्र सरकारतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण असे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. हे पुरस्कार देण्यासाठी योग्य व्यक्ती निवडण्यासाठी राज्य सरकारकडून शिफारशी केंद्रीय समितीकडे पाठवल्या जातात.
या समितीत ना.श्री.चंद्रकांत पाटील, ना.श्री.गिरीश महाजन, ना.श्री उदय सामंत, ना.श्री.दीपक केसरकर, ना.श्री दादा भुसे, प्रधान सचिव – सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) या सदस्यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा :-
Comments are closed.