विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्याा अध्यक्षपदी आ. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई: ६ नोव्हें.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्या सदस्यपदी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी कृषीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री अॅड. आ. आशिष शेलार, माजी पर्यटन मंत्री आ. जयकुमार रावल, माजी मंत्री आ. विनय कोरे, माजी राज्यमंत्री आ. संजय सावकारे आदींचा समावेश आहे.
लोकलेखा समिती ही महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त समिती असून विधीमंडळाच्या कामाकाजात या समितीचे विशेष महत्व आहे. राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरिक्षक यांचा अहवाल, यांचे परिनिरीक्षण करणे, राज्य शासनाच्या वित्तीय लेख्यांचे व त्यावरील लेखा परिक्षा अहवालाचे परिनिरीक्षण करणे, राज्याची महामंडळे, व्यापार विषयक व उत्पादन विषयक योजना व प्रकल्प यांचे उत्पन्न व खर्च दाखविणारी लेखा विवरणे तसेच एखादे विशिष्ट महामंडळ, व्यापारी संस्था किंवा प्रकल्प यांना भांडवल पुरविण्यासंदर्भात नियमन करणा-या वैधानिक नियमांच्या तरतूदी अन्वये तयार केलेला ताळेबंद व नफा तोटयाच्या लेख्यांची विवरणे व त्यावरील नियंत्रक व महालेखापरिक्षक यांचा अहवाल तपासणे, राज्यपालांनी कोणत्याही जमा रकमांची लेखा परिक्षा करण्याबाबत किंवा साठा व मालासंबंधीचे लेखे तपासण्याबाबत नियंत्रक व महालेखापरिक्षक यांना निर्देशीत असेल त्याबाबतीत त्यांच्या अहवालाचा परिक्षण करणे ही लोकलेखा समितीची प्रमुख कर्तव्ये आहेत.
Comments are closed.