Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्याची शान ठरली सुषमीत कौर! गडचिरोली जिल्हा स्तरावर दुसरी, ९६.८०% गुणांची उज्वल कामगिरी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

ओमप्रकाश चुनारकर, अल्लापल्ली (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या अल्लापल्ली येथून एक प्रेरणादायी यशकथा पुढे आली आहे. ग्लोबल मिडिया केरला मॉडेल इंग्लिश मीडियम शाळेची विद्यार्थिनी सुषमीत कौर डॉ.चरणजितसिंह सलूजा हिने दहावीच्या परीक्षेत ९६.८०% गुण मिळवून जिल्हास्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आपले नाव कोरले आहे.

सुषमीतची ही शैक्षणिक घोडदौड केवळ वैयक्तिक यश नसून, अल्लापल्ली सारख्या भागातील विद्यार्थ्यांसाठी ती एक नवी उमेद आहे. तिच्या यशामुळे तिच्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शिक्षकवर्ग, पालक आणि समाजातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अभ्यास, शिस्त आणि चिकाटी यांचा उत्तम संगम कु .सुषमीत ही नेहमीच अभ्यासू आणि शिस्तप्रिय विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. अभ्यासात सातत्य, वेळेचे योग्य नियोजन आणि ऑनलाइन शिक्षणातूनही शैक्षणिक उंची गाठण्याचा तिचा प्रयत्न अखंड सुरू होता. कोविड काळातही जिथे अनेक विद्यार्थी गोंधळले, तिथे सुषमीतने मनोबल न ढळू देता आपला अभ्यास सुरू ठेवला.

शाळा आणि शिक्षकांची साथ..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ग्लोबल मिडिया केरला मॉडेल इंग्लिश मीडियम शाळेमधील शिक्षकांनी तिला योग्य मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांनी तिच्या मेहनतीचे कौतुक करत सांगितले की, “सुषमीतचे यश हे केवळ तिच्या मेहनतीचेच नव्हे, तर आमच्या संपूर्ण शैक्षणिक पद्धतीचे फळ आहे.”

डॉ.आई-वडिलांची प्रेरणा आणि पाठिंबा..

कुं.सुषमीतच्या यशामध्ये तिच्या आई वडिलांचाही मोलाचा वाटा आहे. आई आणि वडील हे दोघेही पेशाने डॉक्टर असून जिल्हाभरात सामाजिक क्षेत्रात मोठ नाव असून सुश्मित्नेही आपल्या मिळालेल्या प्राविण्यातून आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे. आई-वडिलांनी सदैव “तू शिक आणि मोठं हो, आम्ही तुझ्यामागे आहोत,” या शब्दांनी तिच्या आई-वडिलांनी तिला मानसिक बळ दिले आहे.

यशानंतर पुढची दिशा : डॉक्टर होण्याचे स्वप्न..

आपल्या पुढील प्रवासाबाबत विचारल्यावर सुषमीत म्हणते, “मी वैद्यकीय क्षेत्रात जाऊन समाजसेवा करायची इच्छा बाळगते. माझे ध्येय डॉक्टर होणे आहे.” तिच्या या ध्येयासाठी तिचे गाव, शिक्षक आणि मित्र परिवार तिला मन:पूर्वक शुभेच्छा देत आहेत.

प्राविण्य मिळालेल्या सुश्मितकौरचे (बलराम सोमनाणी) भोलू भाऊंनी केले विशेष कौतुक..

इयत्ता दहावीच्या परीक्षेत कु. सुश्मितकौरने प्राविण्य प्राप्त करून आपल्या कुटुंबासोबतच गावाचेही नाव उज्वल केले आहे. या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनाणी उर्फ ‘भोलू भाऊ’ यांनी तिचे भरभरून अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात सदैव जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, लोकसंग्रहात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे भोलू भाऊ हे सहृदयी व संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. सुश्मितकौरच्या घवघवीत यशाने भारावून गेलेल्या भोलू भाऊ म्हणाले, “मी पूर्वी तुला दिलेल्या शुभेच्छा आज सार्थ ठरल्या आहेत. तुझं यश हे माझ्यासाठीही एक वैयक्तिक समाधानाचं आणि अभिमानाचं क्षण आहे.”

Comments are closed.