Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिकलसेल मध्ये काळजी घेणे हेच बिमारी न होऊ देण्यासाठी पुरे आहे- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर 29 जुलै :-  सिकलसेल मध्ये काळजी घेणे हेच बिमारी न होऊ देण्यासाठी पुरे आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले. थैलेसेमिया अँड सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने जेनेटिक ब्लड मॅचिंग अँपचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आज नागपुरातील हॉटेल सेंटर पॉईंट येथे करण्यात आले त्यावेळेला मार्गदर्शन करीत असतांना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले अनेक बिमारी माणसाला तोडत असते दहशत निर्माण करत असते असेही ते म्हणाले. हा जो अँप बनविला आहे तो नक्कीच नागरिकांना माहिती पोहचवेल. संघाचा प्रसार, प्रचार करण्यात आम्हाला मेहनत करावी लागते मात्र तुम्ही म्हणता या कार्यक्रमात आल्याने या बिमारी विषयी प्रचार प्रसार होईल तर मी त्यासाठी तयार आहे असेही ते म्हणाले.

सिकलसेल सारखी बिमारी पासून काय त्रास होतो ते सगळ्यांनी बघितलं पाहिजे त्यातून त्याच्या बद्दल जागरूकता निर्माण होईल. थैलेसेमिया आणि सिकलसेल बद्दल मला माहिती आहे ते फार भयंकर आहे हे मी बघितलं आहे. आता शासनच याकडे लक्ष गेलं आणि त्याविरोधात लढाई ची सुरवात झाली हे चांगलं आहे. शासन आणि डॉक्टर एकत्रित आले आणि एक टाइम बाऊंड कार्यक्रम बनविला तर या जीन ला आपण थांबवू शकतो असेही ते म्हणाले. आपण आज ठरविलं पाहिजे या बिमारी विषयी माहिती देणारा हा अँप सगळ्यांपर्यंत पोहचवू. आमचे स्वयंसेवक या कामासाठी पुढे येईल आणि लोकांपर्यंत पोहचवेल मात्र फक्त स्वयंसेवकांनीच करून चालणार नाही तर इतरांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळेला ज्यांनी या क्षेत्रात चांगले कार्य केले अश्या लोकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. सहजानंद प्रसाद सिंग, डॉ. विंकी रुघवानी उपस्थित होते. कार्यक्रमाला थैलेसेमिया आणि सिकलसेल रुग्ण आणि त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोलीतील पुराला भाजप जबाबदार

Comments are closed.