जिल्हयातील मंदिरे, प्रार्थनास्थळे कोरोना संसर्ग खबरदारी पाळुन सुरु : जिल्हाधिकारी – दीपक सिंगला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि.17 नोव्हेंबर: गडचिरोली जिल्हयातील नागरी, ग्रामीण तसेच आद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशुन यापूर्वी लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित आदेशातील प्रतिबंधात्मक बाबीपैकी, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे/प्राथनास्थळे सुरु करणेबाबत सुधारित आदेश काढण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना संसर्गा बाबत आवश्यक खबरदारी बाळगून सर्व मंदिरे, प्रार्थना स्थळे सुरू करण्यात येत आहेत असे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी काढले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यांच्या निर्देशांच्या अधिन राहून शासन निर्देशाप्रमाणे कोविड – 19 साथरोग अंतर्गत गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये (कंटेनमेंट झोन वगळून) धार्मिक स्थळे/मंदिरे सुरु करण्यास दिनांक 16 नोव्हेंबर, 2020 पासून परवानगी देत आहे. यापूर्वी राज्य शासनाकडून मार्गदर्शक तत्वे दिलेली असून सदर निर्देशांचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल. सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे
Comments are closed.