Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…अन..घरात दडून बसलेल्या अस्वलला वन विभागाने जंगलात लावले पळवून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भंडारा दि ३१ जुलै : धारगाव येथील श्रीराम नंदेश्वर यांच्या पडक्या घरात अस्वल असल्याची प्राथमिक माहिती गावकऱ्यांना मिळाल्याने गावातील नागरिकांची अस्वलाला बघण्यासाठी एकच मोठी गर्दी  केली.त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ माहिती भंडारा वनविभागाला देण्यात आल्यावर वनविभागाचे पथक  गावात दाखल होवून पडक्या घराच्या आजू बाजूची पहाणी केली .त्यांतर अस्वल्ला कसे सुरक्षित काढता येईल याची योजना  आखल्या नंतर  घराच्या चारही बाजू नेट लावून सुरक्षित करत एका अरूंद जागेत पिंजरा लावण्यात आला तर एका बाजूने नेट सैल ठेवन्यात आले होते, जेने करुन अस्वल पिंजऱ्यात अडकले नाही तर सैल नेट कडून जंगलात पडेल .

त्यासाठी जेसीबी च्या सहाय्याने झाडे झुडपे साफ केल्यानंतर जेसीबीचा आवाज  गावातील नागरिकांचा ओरडण्याचा आवाजजाने भयभीत होवून अखेर अस्वल घरातुन सरळ सैलनेट कड़ून जंगलांच्या दिशेने पळाले. या अस्वलला हाकलून लावण्यासाठी चार तास  लागले  शेवटी वन विभागाला  अथक प्रयत्ना नंतर जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात यश मिळाले आहे .यावेळी हा सर्व थरार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी करून आपल्या मोबाइल मध्ये विडीओ कैद केला .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा ,

वाघाची शिकार करून कातडी,चार पंजे तस्करी करणाऱ्याला अटक, वन विभागाची मध्यप्रदेशात कारवाई

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विधिमंडळाच्या ५५ वर्ष कामकाजाचा ‘एकमेव’ साक्षीदार हरपला!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची फसवणूक; जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Comments are closed.