Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बांधकाम विभाग दरवर्षी लाखो खर्च करूनही कोरची-बोटेकसा रस्त्यावर जीवघेणे खड्डे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. 28 डिसेंबर –बोटेकसा या रस्त्याचे बांधकाम सहा महिने आधी झाले. त्यापूर्वी दोन वर्षांत सहा ते सात वेळा स्पॅचेसचे कामे झाली. रस्ता तयार झाल्यावर सुध्दा स्पॅचेसचे कामे झाली. दोन वर्षांत १५ किमी अंतराच्या रस्त्यावर बांधकाम विभागाने करोडो रुपये उधळले. तरीही हा रस्ता आज जसेच्या तसेच आहे. या १५ किमी च्या रस्त्यावर बरेच जीवघेणे खड्डे आहेत.

कोरची येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. जिल्हा परिषदेचे सुध्दा बांधकाम विभाग आहे. दोन्ही विभाग मिळून या अविकसित, अत्यंत मागास, नक्षलग्रस्त तालुक्याच्या विकासासाठी काम करतात. कधी कधी एकच काम आलटूनपालटून दोन्ही विभाग मिळून करतात. तरीही या तालुक्यातील रस्त्याची कामे कमालीची निक्रुष्ठ असतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या तालुक्यात दरवर्षी रस्त्याची कामे करण्यासाठी करोडो चा निधी शासनाकडून मंजूर होतो. सेटिंग करुन निविदा व प्रक्रिया नियोजित पणे केले जाते. तालुक्यातील अप्रशिक्षित कंत्राटदारांच्या मार्फतीने कामे केली जातात. कामे कोणत्या प्रकारची होतात, हे पाहण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी मोक्यावर कधी गेल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच की काय काम कितीही निक्रुष्ठ असले तरी बीले सर्रास मंजूर होतात. व कामांचा स्थर जैसे थे असतो.

तालुक्यात कोणताही राजकीय पुढारी नाही की जो या लोकांवर दबाव आणून कामे करून घेतले असते. वरच्या लेवलचे पुढारी सुध्दा या तालुक्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे नुसता बांधकाम विभाग नाही तर सर्वच विभागात हाच सावळागोंधळ आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.