Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खाजगी प्रवासी वाहनधारकांना आले सुगीचे दिवस

खाजगी वाहन धारक प्रवाशाकडून आकारत आहेत 'अव्वा च्या सव्वा' प्रवास दर. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा गैरफायदा; पोलीस विभागाचे दुर्लक्ष.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सध्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यशासनाने नागरिकांची अडचण लक्षात घेता काही प्रमाणात खाजगी वाहनांना शिथिलता दिली असल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यासाठी काळी-पिवळी टॅक्सी, ऑटो, सफेद रंगाच्या अन्य प्रवासी वाहनातून ने-आण करण्यासाठी मदत होईल, असे वाटत असतांना या ठिकाणी वाहनधारक शासनाने दिलेल्या नियमाला तिलांजली दिली आहे. खाजगी वाहनधारक आपल्या मर्जीप्रमाणे दर आकारून प्रवाशांची लुट केली जात आहे. खाजगी वाहनधारक ‘अव्वा च्या सव्वा’  वाहतुकीचे दर आकारले जात आहे. त्यामुळे गोरगरीब प्रवाशांना याचा चांगलाच फटका बसत आहे.

गडचिरोली, दि. २१ नोव्हेंबर : एसटी महामंडळाच राज्य शासनात विलनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या २३ दिवसांपासून बेमुदत संप पुकारला असल्याने बस फेऱ्या ठप्प आहेत. त्यामुळे आगारातील यार्डमध्ये बसेस जमा केले आहेत. दैनदिन कामासाठी नौकारदार, शेतकरी, व अन्य नागरिक महत्वाच्या कामासाठी एसटी उपलब्ध नसल्याने  खाजगी वाहनाची पर्यायव्यवस्था म्हणून वापर करीत आहेत.  मात्र खाजगी प्रवासी वाहनधारकांनी याचा गैरफायदा घेत ‘अव्वा च्या सव्वा’ दर आकारून प्रवाशाची लुट चालवली आहे. शिवाय वाहनातील आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक नियमाची ऐसी तैसी केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात असलेल्या आलापल्ली शहर हे मध्यभागी असून या शहरातून अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा तसेच चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जाण्यासाठी प्रमुख महामार्ग असल्याने आलापल्ली शहरातूनच इतरत्र आवागमन करावे लागते. याशिवाय दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तसेच मोठी बाजारपेठ असल्याने अतिदुर्गम भागातून आलापल्ली या शहरात येऊन खरेदी करावे लागते. आणि इथूनच आवागमन करण्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध होत असते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शासकीय काम अथवा आरोग्याची समस्या उद्भवल्यास चंद्रपूर, गडचिरोली याठिकाणी उपचारासाठी जावे लागते. मात्र एसटी उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनधारकांची मक्तेदारी निर्माण झाली असून गरजूवंत ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून ‘अव्वा च्या सव्वा’ दर  आकारले जात असले तरी काही खाजगी वाहन चालक मुजोरी करीत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे. प्रवाशी वाहनचालकास काही प्रश्न निर्माण केल्यास वाहन चालक  “आपको जिसको तक्रार करना है करदो, हमारा पॅसेंजर का रेट अधिकारीयोने फिक्स किया है” अशी भाषा वाहन चालकाकडून केली जात आहे.

त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यांनी वाहन धारकांना सवलत दिली हाच प्रश्न अनुतीर्ण आहे. तर कोणत्या अधिकाऱ्यांचे खाजगी वाहन धारकांवर वरदहस्त आहे हे कळायला मार्ग नाही. आजही खाजगी वाहनधारक मुजोरी करतच प्रवाशांना कोंबून नेतच आहेत. एव्हढेच नव्हे तर खाजगी वाहन, सफेद, काळी-पिवळी वाहनाच्या मागे-वर-टपरावर बसवून नेत आहेत. मात्र प्रशासनाचे खाजगी वाहनांकाडे पूर्णता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.  त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन प्रशासन लोकसेवेत कार्यरत असल्याचे कधी तसदी घेणार? असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याने संप पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांची व शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी शासनाने संपकाळात खाजगी वाहनधारकांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली असून एसटीचे तिकीट दर जे आहेत तेच आकारण्यात यावे. एव्हढेच नव्हे तर वाहनातील आसन क्षमता जितकी असेल तेवढेच प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी आहे. याशिवाय मोटार वाहन विभागामार्फत कुठल्याही खाजगी वाहनधारकांना दर ठरवून देण्यात आलेले नाही. त्यामुळे खाजगी वाहन धारक अधिकाऱ्यांच्या नावाचा दुरुपयोग करून फसगत करीत असेल तर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल.
सचिन  जमखंडीकर
मोटर वाहन निरीक्षक,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, गडचिरोली
 

हे देखील वाचा :

मोदी सरकारचा …या निर्णयामुळे सर्वसामान्यांना बसणार फटका; नव्या वर्षात कपडे-चप्पलच्या वाढणार किंमती

जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करा; ‘बार्टी’ चे विद्यार्थ्यांना आवाहन

सहकारी चळवळीमुळे परिसराचा विकास होण्यास मदत- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

 

Comments are closed.