Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविड प्रादुर्भावमूळे ज्यांचे पालक दगावले असतील त्यांचे पूर्ण शिक्षण हे मोफत करण्याचा निर्णय

कोविड प्रादुर्भावमूळे ज्यांचे पालक दगावले असतील त्यांचे पूर्ण शिक्षण हे मोफत करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असून देशातील हा पहिला निर्णय आहे - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना : युती सरकारच्या काळात जालन्यात रसायन तंत्रज्ञान ही संस्था सुरू झाली. संस्थेमुळे निश्चितच मराठवाड्याला फायदा होणार आहे मात्र संस्था मान्यता देऊन पुढील काम केले नाही. आघाडी सरकारच्या काळात आत्तापर्यंत या संस्थेला २० कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र हा सर्व निधी प्राध्यापकांच्या पगारावर आणि इमारत भाड्यावर खर्च झाला आहे. तीन वर्षांमध्ये इमारतीच्या भाड्यावर ५ कोटी रुपयांचा खर्च कसा झाला याची चौकशी केली जाईल. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

जालना जिल्ह्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाची माहिती घेण्यासाठी ते आज जालना दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी या लाखो विद्यार्थ्यांमध्ये कोर्विड प्रादुर्भावामूळे त्यांचे पालक जर दगावले असतील तर त्यांचं शिक्षण मोफत करण्याचा निर्णय महाआघाडी सरकारने घेतला असून देशातला हा पहिला निर्णय आहे व य निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे पत्र कालच विद्यापीठांना दिलं आहे असेही ते म्हणाले.

ICT मध्ये जाऊन माहिती घेतली तेव्हा काय उणिवा आढळल्या यावर पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. रसायन तंत्रज्ञान संस्था विषयी बोलतांना ते म्हणाले की, संस्थेची 203 एकर जमीन फक्त मोजली आहे ती ताब्यात घ्यावी लागेल व जमीन मोजून संस्थेच्या ताब्यात देण्यासाठी आजच जिल्हाधिकार्‍यांशी बोललो असून तेथील संरक्षण भिंतीसाठी ७ कोटी रुपये देणार आहोत. त्यासोबत पॉलिटेक्निक कॉलेजची अर्धवट असलेली इमारती पूर्ण करण्यासाठी दीड कोटी रुपये देणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू – नवाब मलिक

राष्ट्रीय महामार्गालगत शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडकून ३ म्हशींचा मृत्यू

वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले अखेर जीवदान

 

Comments are closed.