ईमु कर्जपिडीत शेतकऱ्यांनी मंत्रालयात जाऊन क्रुषीमंत्री दादा भुसेकडे मांडले गाऱ्हाणे
मुंबई डेस्क, दि. १६ फेब्रुवारी: नाबार्डच्या मान्यतेमुळे पोषक पुरक व्यवसाय भरभराटीला येईल म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी गहाण ठेऊन बॅंकेतून कर्ज काढले खरे मात्र हि योजनाच फसवी निघाल्याने ईमु पालक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले गेले.आता बॅंकांनी हप्त्याची परतफोडीसाठी तगादा लावल्याने कर्जबाजारी शेतकरी भेदरून गेले आहेत.
यातून मार्ग काढण्यासाठी आज दि.१६ फेब्रुवारी रोजी ईमु शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळांनी खासदार राजेंद्र गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पत्रकार प्रवीण ना. दवणे यांच्या पुढाकाराने क्रुषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन ईमु शेतकरी नरे़द्र पाटील, दिनेश शि़दे यांनी ईमु शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली गेली याचा पाढा वाचला. भुसे साहेबांनी यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय मांडून एकूण कर्ज व ईमु शेतकऱ्यांची संख्या यांचा तपशिल मागून मार्ग काढण्यासाठी जातीने मी लक्ष देईल असे आश्वासन दिले.मंत्रालयात खालील ईमु पालन शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ क्रुषीमंत्री दादाजी भुसे साहेबांना भेटण्यासाठी शिष्ट मंडळात दिनेश शिंदे, अविनाश पाटील ,नरेंद्र पाटील, आनंद घोलप, माणिक निपुरते व ज्येष्ठ पत्रकार प्रवीण ना.दवणे,नारायण पांचाळ आदी उपस्थित होते
Comments are closed.