धक्कादायक ! वनरक्षकच ठरला वन्य प्राण्याचा यमदूत
उमरखेड वनपरिक्षेत्रातील तरोडा वन कक्षातील घटना.
वनमंत्र्याच्या यवतमाळ मध्येच वन्यप्राणी असुरक्षित तर महाराष्ट्रात काय सुरक्षित, वन्य प्रेमी ने उपस्थित केला प्रश्न.
यवतमाळ दि 30 डिसे :- उमरखेड वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या तरोडा वन कक्षामध्ये येत असलेल्या उमरखेड पुसद रोड वरील सिद्धेश्वर महादेव मंदिरावर मागील दोन तीन महिन्यापासून रोह्याचे पिल्लू महादेव मंदिरात असलेले पुजारी लोटांगण महाराज पाळत होते. त्याचे सर्व पालन-पोषण हे महाराज करीत होते.
मात्र वनरक्षक आर पी सुतारे यांनी रोह्याचया माणसाळलेलया पिलाला एक तर प्राणी संग्रहालयात सोडायला पाहिजे होते पण तसे न करता जोर जबरदस्तीने मोटरसायकलवर उचलून आपल्या सोबत नेले खाण्या-पिण्याची व्यवस्था न करता तीन महिन्याच्या रोह्याच्या पिलाला कळपामध्ये न सोडता जंगली प्राण्याचे भक्षक बनविण्यासाठी जंगलात सोडून दिले. त्यावेळी जंगलातील कुत्र्याने त्या पिल्लाचे लचके तोडून पिल्लाचा फडशा पाडला. सकाळी वनरक्षक यांनी जबरदस्तीने नेलेले रोह्याचे पिल्लू संध्याकाळी मृत झालेले दिसले. त्यानंतर लगेच पंचनामा करून त्या पिलांचा दफन विधी केला. सर्व घटनेची चौकशी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री असलेले संजय राठोड यांनी करावी अशी मागणी प्राणी मित्र असलेले लोटांगण महाराज, शिवाजी कराळे आणि घुगरे यांनी केली आहे.
वनमंत्री संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून, यवतमाळ जिल्ह्यांचे पालकमंत्री सुद्धा आहेत. त्यांचाच जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात वन्य प्राणी सुरक्षित नाहीत तर महाराष्ट्रात काय होत वन्यप्राणी सुरक्षित असतील असा प्रश्र्न वन्यजीव प्रेमिसह राज्यातील जनतेला पडला आहे.
एकीकडे वनविभाग पक्षी सप्ताह दिनसाजरा करत असताना दुसरीकडे मात्र वन्य प्राण्यांची शिकार केली जात आहे. तरी वनमंत्री संजय राठोड हे काय कारवाई करणार की गप्प बसणार कि कार्यवाही करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.