महायुती सरकारने फक्त जाहिरातबाजी करण्याऐवजी राज्यातील रस्त्यांकडे लक्ष द्यावे
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई,3 ऑगस्ट – रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रेंगाळलेले विस्तारीकरण, रस्त्यावर पडलेले खड्डे यांमुळे वाहनधारकांना त्रास होत आहे.खड्ड्यांनी भरलेल्या महामार्गावर टोल का द्यायचा ? हा सवाल स्थानिक नागरिकांना पडला आहे. बेकायदेशीरपणे टोल वसुली सुरू असूनही सरकार आणि प्रशासन मुकाटपणे बसून उघड्या डोळ्यांनी सगळं बघत आहे असा आरोप करत महायुती सरकारने फक्त जाहीरातबाजी करण्याऐवजी राज्यातील रस्त्याकडे लक्ष द्यावे व काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेत टोलमुक्ती द्यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
कोल्हापूर सांगली, सातारा, पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने किणी, तासवडे, आनेवाडी, खेड शिवापूर येथील टोल नाक्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रेंगाळलेले विस्तारीकरण, रस्त्यावर पडलेले खड्डे यांमुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. खड्ड्यांनी भरलेल्या महामार्गावर टोल का द्यायचा ? हा सवाल स्थानिक नागरिकांना पडला आहे. बेकायदेशीरपणे टोल वसुली सुरू असूनही सरकार आणि प्रशासन मुकाटपणे बसून उघड्या डोळ्यांनी सगळं बघत आहे.
जनतेच्या या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. महायुती सरकारने झोपेतून आतातरी जागे व्हावे असे म्हणत महायुती सरकारने फक्त जाहिरातबाजी करण्याऐवजी राज्यातीलरस्त्याकडे लक्ष द्यावे असे वडेट्टीवार म्हणाले. कंत्राटदार काम करत नाहीत, त्यांचे पैसे थकले आहेत.जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्यावर टोलचा मारा मात्र होत आहे.
मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्गचे कामकाज रेंगाळले आहे म्हणून आज काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केले आहे, टोल हवाच कशाला?असा सवाल करत वडेट्टीवार म्हणाले की,रस्तेच सुरक्षित नाही ,सर्व काम रेंगाळली आहे पण टोल वसुली मात्र सुरू आहे म्हणून काँग्रेसच्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यावी व टोलमुक्ती द्यावी.
Comments are closed.