Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हार्बर रेल्वे कोलमडली.

प्रवाशांचा प्रवास ट्रॅक वरून...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, ३१, ऑगस्ट :-  गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हार्बर रेल्वे तांत्रिक कारणामुळे बंद पडली असून प्रवाशांचे फार मोठे हाल झाले आहेत. मुंबईतील हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठं वृत्त आहे. कारण काही घरगुती गणपती रेल्वेतून घरी आणले जातात. आज घरोघरी श्रीगणेशाचे आगमन आहे. यानिमित्ताने अनेकजण नातेवाईक, मित्रपरिवार यांचेकडे श्रीगणेश दर्शनासाठी जात असतात
दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने हार्बर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली दिसत आहे.
काही तांत्रिक बिघाडीमुळं वाशीवरून ९.४४ ला निघालेली लोकल २७ मिनिटं सीएसटीला उभी होती. त्यामुळं कंटाळून लोक ट्रॅकवरून चालताना दिसत होते. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं ही लोकल सीएसटी स्थानकावर उभी होती, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय. तांत्रिक बिघाडीमुळं ४० ते ५० मिनिटं उशीरा थांबलेली लोकल आता पुन्हा सुरु झाली आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

NH48 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात तरुणीचा बळी…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेतकऱ्यांनी जगायचे की वाघांच्या हल्ल्यात मरायचे..? गडचिरोलीकरांचा संतप्त सवाल..

 

Comments are closed.