Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोडामार्गातील तिलारी खोऱ्यात रानटी हत्तींचे पुन्हा आगमन

केळी, सुपारीची झाडे, मका व अन्य पिकांचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदुर्ग डेस्क 03 फेब्रुवारी :- सिंधुदुर्ग दोडामार्गातील तिलारी खोऱ्यात रानटी हत्तींचे पुन्हा आगमन झाले असून रात्रीच्या वेळी रस्त्यानजीक हत्ती दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हेवाळे, बाबर्डे परिसरात हत्ती कडून केळी, सुपारीची झाडे, मका व अन्य पिकांचे नुकसान केले आहे. गेले काही महिने हत्तींचा उपद्रव तिलारी खोऱ्यात नसल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता. पण हत्तींचे पुनरागमन झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याकडे शासन व वनविभाग गांभीर्याने पहात नसल्याच्या भावना शेतकरी वर्गात आहेत

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.