Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रणालीने शालेय साहित्य वितरण करून साजरा केला वाढदिवस साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपुर 27 जानेवारी :- आपला वाढदिवस हा केक कापून साजरा व्हावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी अनेकजण अवाढव्य खर्च करून आपला वाढदिवस साजरा करतात. परंतु प्रणाली दहागावकर या तरुणीने हे सर्व टाळले. तिचा २४ जानेवारीला वाढदिवस होता पण तिने वाढदिवसाला केक कापला नाही आणि कोणताही अवाढव्य खर्च केला नाही तर त्याच पैशातून ज्या शाळेत प्रणालीने प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविले त्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सकमुर येथील सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी शालेय साहित्य वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.

प्रणाली हि जि. प. उच्च प्राथमिक शाळा सकमुर येथील माजी विद्यार्थिनी असून ती सध्या चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय येथे अकरावी मध्ये शिक्षण घेत आहे. तिने केलेल्या कार्याबद्दल शिक्षकांनी प्रणालीचे कौतुक केले आहे. ज्या शाळेने मला घडविले, वाढविले आणि शिकविले त्या शाळेप्रती आपले काही तरी देणं लागते हा विचार ठेऊन मी शालेय साहित्य वाटप केले असे प्रणालीने आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एकीकडे आजची तरुण पिढी वाढदिवसाच्या नावावर हजारो रुपये उधळताना दिसते तर दुसरीकडे प्रणालीने वाढदिवशी केक न कापता आणि इतर खर्च टाळून सामाजिक जाणिवेतून पुढे येऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप केले ही बाब नक्कीच प्रेरणादायी आहे. प्रणालीचा आदर्श समोर ठेऊन आजच्या तरुण मंडळींनी सुद्धा अशा प्रकारे वाढदिवस साजरा करायला पाहिजे.

यावेळी वेडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख इंद्रपाल मडावी, जि प उच्च प्राथमिक शाळा सकमुरचे प्रभारी मुख्याध्यापक खुशाल काळे, सकमुर चेकबापुर गट ग्रामपंचायतचे उपसरपंच जीवन अलोणे, सदस्य संतोष मुलगवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवण टेकाम, दिगाबर कोरडे, जि प उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षिका कु. सोनी पद्मीकर, शिक्षक तुफान मानकर, किशोर गेडाम, सुरेश जुमनाके, सेवा समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश कातकर, गंगाराम जक्कुलवार, राजेश्वर पिपरे, पत्रू दहागावकर, श्रुती मुलगवार आणि मोठ्या संख्यने विद्यार्थी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.