अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दोघांनी केला अत्याचार नंतर कला केंद्रात केली विक्री
.लातूर पांगरी आणि अंबाजोगाई येथील सहा जणांवर गुन्हा दाखल.
लातूर एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांनी केले पाच लोकांना अटक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लातूर दि २२ डिसेंबर :- जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दोन जणांनी अत्याचार करून त्यांतर कला केंद्रात विक्री केल्याची खळबळजनक घटना तक्रारीमुळे समोर आली असून लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आले असून पोलिसांनी आपले तपास चक्र तीव्र करून लातूर पांगरी आणि अंबाजोगाई येथील सहा जणांवर गुन्हा दाखल केले आहे .घटनेतील अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या आईच्या मदतीने मुलीचे अपहरण केले आहे सध्या अल्पवयीन मुलाची आई फरार असले तरी लातूर एमआयडीसी च्या पोलिसांनी पाच लोकांना केले अटक .
लातूर एमआयडीसी ठाण्यात शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे त्या घटनेत विशेष म्हणजे अल्पवयीन मुलाच्या आईच्या मदतीनेच हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जण अटक करण्यात आली आहे. लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलगी घर सोडून गेल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, याचा पोलिसांनी अधिक तपास केला असता सदरील मुलगी अंबाजोगाई येथे असल्याची माहिती मिळाली …त्या मुलीस अंबाजोगाई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सदरील मुलीच्या जबाबवरून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या आईने सदरील मुलीचे अपहरण केल्यानंतर बार्शी तालुक्यातील पांगरी येथील कला केंद्रावर नेण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसातच येथील कला केंद्राच्या मालकाने या मुलीला अल्पवयीन मुलाच्या आईच्या हवाली केले. त्यानंतर अंबाजोगाई येथे तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते. या दरम्यान, अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केला असल्याचे मुलीने सांगितले आहे. त्यानुसार पांगरी कला केंद्रावरील दोघेजण, अंबाजोगाई येथील दोन तर मुलीच्या ओळखीच्या अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, अल्पवयीन मुलाची आई ही फरार आहे. पीडित मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघेही अल्पवयीन आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहे .
Comments are closed.