Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

व्हिडिओ व्हॅनने वेधले 24 गावांतील ग्रामस्थांचे लक्ष

मनोरंजक लघु चित्रपटातून पटवून दिले व्यसनाचे दुष्परिणाम

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 20 जून – जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण , दुर्गम व अतिदुर्गम गावातील नागरिकांना दारू व तंबाखूचे दुष्परिणाम समजावे. ज्यांना या पदार्थाचे व्यसन नाही त्यांनी त्याच्या आहारी जाऊ नये.  ज्यांना व्यसन आहे त्यांनी स्वत: किंवा गरजेनुसार मुक्तिपथ क्लिनिक मध्ये उपचार घेऊन व्यसन सोडावे. या उद्देशाने मुक्तिपथ अभियानातर्फे  व्हिडिओ व्हॅन चित्ररथ द्वारा शाळेत, गावात, बाजारात जागृती सुरु आहे. याच अनुषगाने नुकतेच भामरागड तालुक्यातील तालुका मुख्यालयासह विविध 24 गावांमध्ये व्हिडीओ वॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

भामरागड तालुक्यातील लाहेरी, मल्लमपोडुर, कुक्कामेठा, हिंदेवाडा, जुव्वी, दर्भा, धोडराज, राणीपोडूर, मेडपल्ली, कारमपल्ली, हलवेर, नारगुंडा, कियर, भामरागड, हितापाडी, हिदूर, धुदेपल्ली, केडमरा, कुळकेली, कुमरगुड, टेकला, कृष्णार, ताडगाव, हेमलकसा, आरेवाडा, इरकडुंमे, चिचोडा, जीजगाव, हिणभट्टी, दुबगूड्डा चौका-चौकात व्हिडिओ व्हॅनच्या माध्यमातून ‘यमराजाचा फास, शाब्बास रे गण्या,  व्यसन उपचार शिबीर’ याबद्दलचे लघुचित्रपट दाखवून लोकांना व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. सोबतच मुक्तीपथचे आबीद शेख यांनी मार्गदर्शन करून मुक्तिपथ तर्फे सुरु असलेले व्यसन उपचार गाव पातळी शिबीर व तालुका क्लिनिकची माहिती, व्यसनमुक्त होण्यासाठी उपचाराची गरज आदींबाबत माहिती देत लोकांच्या प्रश्नाचे निराकरण केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.