Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उद्या पासून नागपुरात कोणतेही स्थानिक निर्बंध नाही; पालकमंत्री नीतिन राऊत यांनी केली घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. ३१ मार्च: नागपुरात वाढत्या कोरोनाचा संसर्गाला रोखण्यासाठी नागपुर शहरात गेल्या १५ ते ३१ मार्च पर्यत जिल्हा प्रशासनातर्फे कड़क निर्बंध लावण्यात आले होते. आज या कड़क निर्बंधाचा शेवटचा दिवस असल्याने राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री नितिन राऊत यांनी आज नागपुरात कोरोना आढावा बैठक घेतली.

या बैठकीत नागपूर महानगर व पोलीस आयुक्त परिसरात ३१ मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे रात्रीची जमावबंदी फक्त सुरू असेल. या व्यतिरिक्त नागपुरात अन्य कोणतेही  स्थानिक निर्बंध नसतील अशी घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केली आहे. गेल्या १५ ते ३१ मार्च दरम्यान लावण्यात आलेल्या कड़क निर्बंधचे नागपुरातील जनतेने तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य केल्याने पालकमंत्री नितिन राउत यांनी नागपुरातील जनतेचे आभार मानले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.