Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विदर्भात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाचा अलर्ट ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर : भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (दि. ८ मे २०२५) सायंकाळी ५.४० वाजता विदर्भातील काही भागांसाठी Nowcast Warning जारी केली आहे. या इशाऱ्यानुसार अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील निवडक ठिकाणी पुढील १ तासाच्या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वादळी वारे देखील या भागांमध्ये अनुभवास येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना किंवा मोकळ्या जागांमध्ये असताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.