भरधाव टिप्परची ऑटोला धडक, दोन महिला ठार ऑटोचालकासह तीन महिला गंभीर जखमी
हिंगणघाट- नंदोरी मार्गाजवळील घटना, संतप्त जमावाने टिप्परला आग लावून पेटविले
जखमींना हिंगणघाट रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हिंगणघाट डेस्क 28 डिसेंबर :- नंदोरी मार्गावर आज १२ वाजताच्या दरम्यान शेतात मजूर घेऊन जात असलेल्या ऑटोला भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने धडक दिली. हा अपघात भीषण असल्याने घटनास्थळी दोन महिलेचा मृत्यू झाला तर चालकासह तीन महिला गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करताच टिप्परला जमावाने आग लावली यात टिप्परचा समोरील भाग जळून खाक झाला. हे पण वाचा :वाघाने केले गाईला ठार
जखमींना उपचारासाठी हिंगणघाट रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी हिंगणघाट पोलीस पोहचल्या नंतर टिप्परची आग विझवण्यासाठी टँकर बोलावण्यात आले त्यानंतर टिप्पर आग आटोक्यात आणण्यात आली. संतप्त नागरिक शांत झाल्याने मोठी दुर्घटना टळली यात टिप्पर चालक वाहन सोडून पळून गेल्याने टिप्पर चालकाचा जीव वाचला.ओव्हरलोड भरून जाणाऱ्या टिप्परने रस्त्याची वाट लावल्याने नागरिक रोष व्यक्त करत आहे.
Comments are closed.