Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वर्धा जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवसाचे लॉक डाऊन

  • शनिवार रात्री 8 पासून सोमवारी सकाळी 8 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी
  • दुकाने, चहा टपऱ्या, प्रतिष्ठाने बंद
  • वाहतूक व्यवस्था राहणार बंद

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. १९ फेब्रुवारी: वर्धा जिल्ह्यात दोन दिवसाचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शनिवारी रात्री ८ वाजतापासून हे लॉक डाऊन सुरू होणार आहे. शनिवार आणी रविवार असे दोन दिवस हे लॉकडाऊन राहणार आहे. जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान दुकाने, प्रतिष्टाने आणि पेट्रोल पंप देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी असणार आहे. या दरम्यान औषधी दुकाने आणि रुग्णालय उघडी ठेवण्यात येणार आहेत. दूध आणि औषधासारख्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र सुरू ठेवण्याचे आदेशात नमूद आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.