Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रवाश्यांच्या सोयीसाठी अद्ययावत बस स्टॉप

इनर व्हील क्लब ऑफ पालघरचा स्तुत्य उपक्रम..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर प्रतिनिधी दीं,१८ : पालघर जवळील माहीम ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुंदरम नाका येथे विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी इनर व्हील क्लब ऑफ पालघर यांनी अद्ययावत बस स्टॉप बांधले आहेत. या सर्व बस स्टॉपचे लोकार्पण गुरुवार दिनांक १५ जून २०२३ रोजी थाटामाटात करण्यात आले.

या प्रकल्पाचा फायदा आजूबाजूच्या परिसरातील बहुसंख्य नागरिकांना होणार असून, परिसरातील बऱ्याच नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून स्वागत केले व इनर व्हिल क्लब ऑफ पालघर चे आभार मानले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर बस स्टॉप चे उद्घाटन इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१४ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मिता शेठ ह्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माहीम ग्रामपंचायतीच्या सर्व लोक प्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य लाभले असून इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या अध्यक्षा नियती नितीन उलकंदे ह्यांचा हा स्वप्नपूर्ती प्रकल्प पूर्ण झाल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले. सदर प्रकल्पासाठी पालघर मधील काही दानशूर दात्यांनी जाहिरातीच्या, देणगीच्या माध्यमातून प्रकल्पाला योगदान दिले. क्लबचे सचिव संपदा मयूर काशिकर तसेच प्रकल्प प्रमुख प्रीती अरुण पाटील व रोटरी क्लब ऑफ पालघर चे माजी अध्यक्ष मयूर काशिकर , अरुण पाटील यांचे देखील सदर प्रकल्पासाठी मोठे योगदान लाभले.

डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रेरणा रायचूर, डिस्ट्रिक्ट आय.एस.ओ. मोना ग्यानी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. सदर लोकार्पण समारोहासाठी इनर व्हील क्लब ऑफ पालघर, रोटरी क्लब ऑफ पालघर, इनर व्हिल क्लब ऑफ बोरिवली, माहीम ग्रामपंचायत मधील लोक प्रतिनिधी, ग्रामस्थ व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.